Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत ख्रिसमस मध्ये हुडहुडी भरणार, मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

Mumbai will be full of cold during Christmas
, शनिवार, 24 डिसेंबर 2022 (08:40 IST)
मुंबई : मेंडोंस चक्रीवादळाचा परिणाम कमी झाला असल्याने तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. महाराष्ट्रासह, राजस्थान, गुजरात या राज्यामध्ये थंडीची लाट आल्याचे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात तापमानामध्ये चढ उतार होत असल्याचे दिसून येत आहे.
 
दरम्यान, पावसाची स्थिती नसल्याने दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे, तर संध्याकाळपासून किमान तापमानात घट होताना दिसून येत आहे. तर राज्याच्या काही भागामध्ये चांगलाच गारठा जाणवत आहे. आज मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्याच्या किमान तापमानामध्ये घट झाल्याने परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये राज्यातील निचांकी १०.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११ अंश, औरंगाबाद येथे ११ अंश, निफाड येथे ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यांमध्ये किमान तापमानाचा पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान होता.
 
तर रत्नागिरी राज्यामधील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानात देखील ११ ते २० अंशांपर्यंतची तफावत दिसून येत आहे. परिणामी, पहाटे गारठा, तर दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. राजस्थानातील चुरू येथे गुरुवारी (दि. २२) देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील पंजाब, राजस्थान, हरियाना या राज्यांमध्ये देखील थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा आहे. तर चंडीगड, हरियाना, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेशात दाट धुक्याची स्थिती कायम राहणार आहे. आजपासून राज्याच्या तापमानामध्ये घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये किमान तापमान घट झाली. सध्या राज्यामधील मराठवाड्यासह, विदर्भ आणि पश्चिम महाष्ट्र चांगलाच गारठला आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली आल्याने हुडहु़डी वाढली आहे. परिणामी २५ डिसेंबर मुंबईत थंडी वाढणार असल्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली असून औरंगाबादमध्ये किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र च्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारी पर्यंत "अटल युवा पर्व" चे आयोजन