Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू ; आशिष शेलार

Mumbaikars keep getting questions every day. We keep asking that; Ashish Shelarमुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू  ; आशिष शेलार Marathi Mumbai News  In Webdunia Marathi
, शनिवार, 15 जानेवारी 2022 (21:26 IST)
मुंबई येथे शिवसेना  भाजप यांच्यात वाद सुरु आहे. आता  प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही  , या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर भाजपने  पलटवार केला आहे. गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू. कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही?, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आशिष शेलार यांनी सलग चार ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे ,त्यात त्यांनी प्रश्न विचारले आहेत कि,  गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का केला आहे? मागील २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? ११४ टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुनही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले? मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले? परीक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?,असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर वातावरण तापले आहे.
 मुंबईत गेल्या ११ वर्षात ४० हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली? कोस्टलरोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा? मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले? मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले? असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण… प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पालिकेच्या कार्यक्रमात विरोधकांवर टीका केली होती. कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी आपलं कौतुक केलं नाही. थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. कौतुक किती होईल याची मला चिंता नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१३ वर्षीय गीतने अवघ्या एका मिनिटात केली ३९ योगासने; चार बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद