Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

Webdunia
शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (19:28 IST)
Mumbai News : महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या विजय चव्हाण यांचा रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान जाणाऱ्या लोकलसमोर दोघांनी गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी दोन्ही जणांविरुद्ध वाशी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
ALSO READ: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 ठार
मिळालेल्या माहितीनुसार मयत विजय चव्हाण हा घणसोली येथे राहत होते. हेडकॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकलसमोर दोघांनी ढकलून दिले. याबाबत मोटरमनने लोहमार्ग पोलिसांना माहिती देताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी सदर घटनेतील मृत पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याची माहिती समोर आली आहे. वाशी रेल्वे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेचे नाव विजय रमेश चव्हाण 42असून तो घणसोली येथील रहिवासी आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

LIVE: रामदास आठवले म्हणाले भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

बुलढाणा जिल्ह्यातील धमक्यांना कंटाळून प्रियकराने केली आत्महत्या... तीन वर्षांच्या प्रेमकथेचा दुःखद अंत!

पालघरमध्ये भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

१२ वर्षांनंतर मिळाला अल्पवयीन मुलीला न्याय, बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने आरोपीला ठोठावली शिक्षा

पुढील लेख
Show comments