Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नार्कोटिक्स विभागच्या अधिकाऱ्याची ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या

Narcotics officer commits suicide by jumping in front of train नार्कोटिक्स विभागच्या अधिकाऱ्याची ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या Marathi Mumbai News  In Webdunia Marathi
, शनिवार, 25 डिसेंबर 2021 (10:12 IST)
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाचे उप निरीक्षकाने ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. रमेश मोहिते असे मयत अधिकाऱ्याचे नाव आहे. मोहिते हे राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक नार्कोटिक्स विभागात अधिकारी होते. हे मालाड येथे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह राहायचे. सोमवारी दुपारच्या वेळेत हे मालाड रेल्वे स्थानकावर आले आणि अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मेल समोर उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळतातच बोरिवली रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड  नोट सापडली असून पोलीस पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांचा जवाब नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अटलबिहारी वाजपेयी जयंती विशेष : अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील अंक 4 ची खास भूमिका