Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नवनीत राणा यांना बीएमसीने बेकायदा बांधकामांच्या चौकशीची नोटीस दिली

नवनीत राणा यांना बीएमसीने बेकायदा बांधकामांच्या चौकशीची नोटीस दिली
, मंगळवार, 3 मे 2022 (19:39 IST)
देशद्रोहाचा खटला सुरू असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राणा दाम्पत्य आधीच तुरुंगात आहे. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) त्यांना कथित बेकायदा बांधकामासंदर्भात नोटीस बजावली आहे. बीएमसीचे अधिकारी 4 मे रोजी किंवा त्यानंतर नवनीत राणा यांच्या फ्लॅटची तपासणी करतील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम सुरू असल्याची चर्चा आहे. तपासणीत अवैध बांधकाम आढळून आल्यास ते पाडण्याची कारवाई करण्यात येईल. 
 
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या वादातून दोघांना अटक करण्यात आली. तेव्हापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत असून उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
 
बुधवारी होणार सुनावणी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारीही सुनावणी झाली, मात्र निर्णय झाला नाही. आता बुधवारी जामीन अर्जावर निर्णय अपेक्षित आहे. कोर्टात इतर प्रकरणांची सुनावणी सुरू झाली आणि त्यानंतर वेळेच्या कमतरतेमुळे सोमवारी निर्णय होऊ शकला नाही. राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 15A, 353 तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राणा दाम्पत्यावर 124A म्हणजेच देशद्रोहाचे कलमही लावण्यात आले आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाढणाऱ्या तापमानामुळे ,राज्यावर पाणी टंचाईचे संकट