Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चौकशीनंतरच काय ते समोर येईल त्यावर फार काही बोलू शकणार नाही :नवाब मलिक

ncp leader
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (07:18 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजित न्यायमंत्री धनंयज मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
 
'एखादी तक्रार झाली तर त्याची चौकशी होत असते. पण आरोप करणारी महिला त्यांची नातेवाईक आहे. तक्रारदाराच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांनी लग्न केलेले असून, उभयतांना दोन मुलेसुद्धा आहेत. याच्यामागे काय कारण आहे ते चौकशीत सगळे समोर येईल. त्याची जी बाजू आहे ती निश्चित प्रकारे ते मांडतील. एखाद्या महिलेसोबत त्यांचे लग्न आधी झालेले आहे, त्यांची मुले आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकत होत्या. आता त्यांच्या बहिणी समोर येत आहेत. चौकशीनंतरच काय ते समोर येईल. त्यावर फार काही बोलू शकणार नाही,' असेही नवाब मलिक म्हणाले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणारी रेणू शर्मा आहे तरी कोण ?