Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत 5 कोटी रुपयांच्या बंदी घातलेल्या पदार्थांसह नायजेरियन महिलेला अटक

arrest
, शुक्रवार, 20 जून 2025 (12:05 IST)
डीआरआय मुंबईने वांद्रे येथील कला नगर बस स्टॉपवर नायजेरियन महिलेला ब्लेसिंग फेवर ओबोहला अटक केली. तिच्या कडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहे. 
मुंबईतील वांद्रे परिसरातील कला नगर बस स्टॉपवर ही अटक करण्यात आली, जिथे ही महिला दिल्लीहून बसने आली होती. डीआरआयला गुप्त माहिती मिळाली होती की एक महिला परदेशी नागरिक ट्रॉली बॅगमध्ये ड्रग्जचा मोठा साठा घेऊन प्रवास करत आहे.
ALSO READ: मुंबई: कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थिनीची आत्महत्या
तपासादरम्यान, तिच्या बॅगमधून सुमारे 2.563 किलो अॅम्फेटामाइन आणि सुमारे 584 ग्रॅम एक्स्टसी ड्रग्स जप्त करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात या पदार्थांची अंदाजे किंमत 5 ते 10 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.NDPS कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार महिलेला अटक करण्यात आली आहे.
डीआरआय आता या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपी आणि नेटवर्कची चौकशी करत आहे. ही महिला भारतात कोणाशी संपर्क साधणार होती आणि तिने यापूर्वी ड्रग्जची तस्करी केली आहे का हे देखील शोधण्याचा प्रयत्न एजन्सी करत आहे. ड्रग्ज तस्करीविरुद्ध ही कारवाई एक मोठे यश मानले जात आहे.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे यांना धक्का! शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम सुर्वे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील