Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Omicron: दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बाबत BMC चे नवीन मार्गदर्शक तत्व

Omicron: BMC's new guidelines on new variants of corona found in South Africa Omicron: दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बाबत  BMC चे नवीन मार्गदर्शक तत्वMaharashtra News Mumbai Marathi News In Webdunia Marathi
, रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (13:08 IST)
Omicron variant: बृहन्मुंबई महानगरपालिकेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आफ्रिकन देशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणू 'ओमिक्रॉन'चे नवीन प्रकार समोर आल्यानंतर देशातील आरोग्य संस्था तसेच महापालिका यंत्रणा सतर्कतेच्या अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC मुंबई) महत्त्वपूर्ण बैठक झाली. आफ्रिकन देशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दर 48 तासांनी क्वारंटाईन केलेल्या प्रवाशांची कोविड चाचणी होईल. 
आफ्रिकेतून मुंबईला जाणाऱ्या सर्व फ्लाइटवर बंदी घालण्याची विनंती मुंबई महापालिका केंद्राला करत आहे. त्याचबरोबर परदेशात प्रवास करणाऱ्या सर्व लोकांचा प्रवास इतिहास तपासला जाईल. गेल्या 14 दिवसांत एखादा नागरिक आफ्रिकेत गेला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. याशिवाय जम्बो कोविड सेंटरचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मुबंईत विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी -पीसी आर  चाचणी अनिवार्य केली आहे 
 मुंबई महापालिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशा देशांसाठी उड्डाणे थांबवण्याची विनंती केली आहे जिथे कोरोना (Covid-19) ओमिक्रॉन ((Omicron) चे नवीन प्रकार आढळले आहेत. गुजरातने युरोप, यूके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, हाँगकाँग येथून विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगांव हादरलं : नातलगानेच 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला