Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला

rain alert in 8 states
मुंबईत मान्सूनने जोर धरला असून, मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
ALSO READ: मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई, व्हॉट्सॲप डीपी घोटाळ्याचा पर्दाफाश
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील सखल भाग पाण्याखाली गेले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विले पार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे यासह पश्चिम उपनगरातील सर्व भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्री मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यानंतर सकाळी तो पुन्हा तीव्र झाला. पश्चिम उपनगरात मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचू लागले आहे.

पावसाचा परिणाम मुंबईतील तिन्ही लोकल लाईन्सवर झाला आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहे.

अपघातात दोघांचा मृत्यू
पावसाशी संबंधित दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर शहरातील वाळकेश्वर परिसरात तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याने एका ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
ALSO READ: सांगलीत तरुणाची आत्महत्या, मुस्लिम मुलीच्या प्रेमात होता धर्मांतर करण्याच्या दबाव, आईचा आरोप
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांकरिता 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. २ आणि ३ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आला आहे.
ALSO READ: पुण्यात झोपलेल्या मजुराला जेसीबीने चिरडले! पुरावे नष्ट करण्याचा आरोप; ५ जणांवर गुन्हा दाखल
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

France vs Sweden: फ्रान्सने स्वीडनवर ३-० ने विजय मिळवला, एमबाप्पेने दोन गोल केले