Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घातपाताची शक्यता?, महिन्याभरात प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा तिसरा अपघात

Possibility of an accident ?
, शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (14:53 IST)
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका गाडीचा शनिवारी सकाळी अपघात झाला. मुंबईतील जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडदरम्यान हा अपघात झाला आहे. गेल्या महिन्याभरात प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे यामागे घातपात असल्याची भीती व्यक्त केली जातेय. यामुळे प्रवीण दरेकर याबाबत मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे.
 
या घटनेवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यभरात मी पक्षाच्या कामानिमित्त फिरत असतो. मात्र गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा माझा गाडीचा अपघात झाला आहे. दरवेळी बाईस्वार समोर आल्यामुळेच अपघात झाला आहे. आजही मुंबईत आमच्या गाडीसमोर अचानक एक बाईकस्वार आला आणि त्यामुळे गाडीचा अपघात झाला. त्यामुळे मला घातापाताचा संशय येतोय. याप्रकरणी चौकशीची मागणी करणार आहे. तसेच लवकरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून तक्रार देणार आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रशियावर कोरोनाचा 'महा मार', एका दिवसात 1,80,071 नवे रुग्ण