suvichar

'एक देश, एक निवडणूक'वर राज ठाकरेंचा टोला

Webdunia
गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (11:07 IST)
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला 'एक राष्ट्र, एक निवडणूक' करण्याची एवढी काळजी असेल तर त्यांनी आधी महाराष्ट्रात महापालिका निवडणुका घ्याव्यात, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्रात बृहन्मुंबई महानगरपालिका सह अनेक नगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार यासंदर्भात राज ठाकरे यांनी बुधवारी 'एक्स' या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले की, निवडणुकीला एवढे महत्त्व दिले जात असेल तर आधी महापालिका निवडणुका घ्या.
 
तसेच ते म्हणाले की, अनेक महापालिका संस्था गेल्या चार वर्षांपासून प्रशासकांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असली तरी राज्यांच्या मतांचाही विचार केला पाहिजे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
 
एवढेच नाही तर देशात कोणतेही राज्य सरकार पडले किंवा विधानसभा बरखास्त झाली किंवा मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्या तर काय केले जाईल, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. "एक देश, एक निवडणूक" योजनेवर पुढे जात, केंद्र सरकारने बुधवारी देशभरात एकमत निर्माण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने लोकसभा, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

National Safety Day2026: राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास, महत्त्व आणि आपली जबाबदारी

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

६०० हून अधिक भारतीयांना घेऊन दोन विशेष विमाने दिल्लीत दाखल, ऑपरेशन सुरू

वर्धा-चंद्रपूर सीमेवर वाळू माफियां मधील टोळीयुद्धात भारतीय जनता पक्षाचे नेते भरत नागपाल यांची निर्घृण हत्या

पश्चिम आशियातील तणावामुळे टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव दुबईत अडकले

पुढील लेख
Show comments