सोमवारी बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या वर विरोधकांनी पोलिसांवर आणि सरकारवर प्रश्न निर्माण केले आहे. यावर प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपीला विकृत मानसिकता असलेला माणूस म्हटले आहे.
बलात्कार प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात होती.बदलापुरात त्याला शिक्षा देण्यासाठी लोकांनी 9 तास ट्रेन रोखली. या घटनेमुळे लोकांमध्ये तीव्र संताप होता. आरोपीला फासावर देण्याची मागणी नागरिक करत होते. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी एसआयटीचे गठन करण्यात आले.
या वर विरोधक राज्यात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचे म्हणत होते आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जात होती. मात्र आता त्याला का मारण्यात आले असा प्रश्न केला जात आहे. हे असं कसे चालणार म्हणत अजित पवार माविआ वर संतापले.
सोमवारी त्याला पोलीस चौकशीसाठी कारागृहातून नेत असताना शेजारी बसलेला पोलिसाचे रिव्हॉल्वर काढले आणि तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एक गोळी पोलिसाला लागली. या वर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमकीत तो ठार झाला. या घटनेची चौकशी केली जाईल पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हे पाऊल घेतले.
लहान चिमुकल्यांवर अत्याचार करताना त्याला लाज कशी वाटली नाही. तो विकृत मानसिकतेचा होता. मी या घटनेचे समर्थन करत नाही पण या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.