Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईसह पाच जिल्ह्यात नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी सुरू

Registration and re-registration of Civil Defense Volunteers started in five districts including Mumbai
, सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (21:35 IST)
मुंबई, आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपल्या जिल्हा उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल यांच्या कार्यालयाशी  संपर्क साधावा, असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. के व्यंकटेशन यांनी केले आहे.
 
नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर बचाव व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता वाढविण्याचे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.
 
नागरी संरक्षण दलामध्ये सामिल होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी व पुनर्नोंदणी करावी, असेही आवाहन नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. के व्यंकटेशन यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

T-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग घेणाऱ्या दोघांना अटक; 4.65 लाखाचा मुद्देमाल जप्त