Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नात्याला काळिमा : मित्राच्या बर्थडे पार्टीत पतीसह मित्रांनी सामूहिक बलात्कार केला, आरोपी पतीला अटक

Relationship stigmatized: Accused husband arrested for gang-raping friends at husband's birthday party नात्याला काळिमा : मित्राच्या बर्थडे पार्टीत पतीसह मित्रांनी सामूहिक बलात्कार केला
, मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (13:30 IST)
असं म्हणतात की पती-पत्नीचं नातं साता जन्मासाठी आणि अतूट असत. पण  मुंबईतील आंबोली परिसरात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक  आणि संतापजनक घटना घडली आहे .येथे एका पतीने आपल्या पत्नीसह जे काही केले आहे ते घृणास्पद आहे. या आरोपी पतीने मित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून पत्नीला देखील आपल्या सोबत मित्राकडे नेले . पार्टी सुरु असताना पतीने आपल्या पत्नीला दारू पाजली .दारू प्यायल्यावर तिचे भान हरपले. तिला कसलीही शुद्ध न्हवती. आरोपी पतीने बेशुद्ध असलेल्या पत्नीवर बलात्कार केला आणि तिला आपल्या मित्रांच्या हवाली केल. शुद्धीत आल्यावर तिने स्वतःला एका बेड वर निजलेले बघितले तिचे कपडे अस्तव्यस्त होते. तिला स्वतःसोबत काही अघटित घटल्याचे समजले . तिने पतीला या प्रकरणाचा जाब विचारल्यावर  या बाबत कोणाला काही सांगितले तर तुला जीवानिशी ठार करेन. अशी धमकी दिली. पीडित महिलेने  घडलेला सर्व प्रकार आपल्या घरातील लोकांना सांगितल्यावर  कुटुंबीयांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपी पती  आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार नोंदून गुन्हा दाखल करून आरोपी पतीला मित्रांसह अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला तीन  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आंबोली पोलीस घटनेचा तपास करत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काळाने घात केला , ट्रॅक्टर घरावर उलटून झोपेतच महिलेचा मृत्यू झाला