Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील लॉकडाऊनमध्ये घातलेले निर्बंध काही ठिकाणी उठणार, काही नवीन नियम लागू होणार

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2020 (09:37 IST)
मुंबई शहर आणि आजुबाजूच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रवासासाठी लॉकडाऊनमध्ये घातलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत. त्यामुळे या भागात प्रवास करण्यासाठी आता कोणत्याही पासची गरज नाही. राज्य सरकारने आधी जारी केलेल्या नियमावलीत तसे बदल केले आहेत. राज्य सरकारने मिशल बिगेन अगेन अंतर्गत जारी केलेल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर विभागात (MMR) प्रवासाचे निर्बंध शिथिल केले आहेत.
 
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या भागात आता नागरिकांना पासशिवाय प्रवास करता येणार आहे. याआधी अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या कामासाठी पास घेऊनच प्रवास करण्याची मूभा होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. खाजगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ८ जूनपासून खाजगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी यापैकी जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने खाजगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण ७ जूनपासून सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. विद्यापीठ, कॉलेज आणि शाळा यातील शिकवण्याचे काम सोडून इतर कामे सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यात ऑनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येईल, असे नियमावलीत म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अटल सेतूवर कार डंपरच्या अपघातात एकाचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

केदारनाथ यात्रे दरम्यान महाराष्ट्रातील एका प्रवाशाचा मृत्यू

भाजप आमदारांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर, फडणवीसांनी दिले कारवाईचे निर्देश

विंध्यवासिनी ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई, 81.88 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पुढील लेख
Show comments