suvichar

'या' क्षेत्रातील शाळा सध्या सुरू होणार नाहीत

Webdunia
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (10:39 IST)
वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईसह ठाणे जिल्हा आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सध्या सुरू होणार नाहीत, असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले.
 
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानूसार ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनांची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या. ठाणे  जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना शुक्रवारी तसे निर्देश दिले. तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना संबंधित यंत्रणांना दिले आहेत
 
दुसरीकडे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नसले तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न? अडवाणी, गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांच्याशी होणाऱ्या तुलनेमागील 'इनसाईड स्टोरी'

मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान विषारी गोळ्या वाटण्यामागे काय कारण होते? नवीन खुलासे समोर आले

अजब चोरी! 'पंतप्रधान मोदींचा' मुखवटा घालून आला आणि दुकानातून ४० मोबाईल लंपास केले!

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आदित्य ठाकरेंचे निकटचे सहकारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

महाराष्ट्रात कारागृहांमध्ये शिक्षण घेत असलेल्या कैद्यांना त्यांच्या शिक्षेतून ९० दिवसांची सूट मिळणार

पुढील लेख
Show comments