Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडले

Shiv Sena and BJP corporators clashes
, शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (16:51 IST)
मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून पालिकेत जोरदार राडा झाला. शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडले. स्थायी समितीत या विषयाचा हरकतीचा मुद्दा घेवू न दिल्यानं भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली. 
 
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनासमोर भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शिवसेना नगरसेवक ही तिथे आल्याने राडा झाला. दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांना भिडले आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. 
 
ही शिवसेनेची दादागिरी आहे. धमकावणे आणि काम करु न देणे, ही यांची पद्धत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपचे आरोप फेटाळले आहे. आम्ही चांगले काम करत आहोत. मात्र, काहीतरी करुन खोडा घालण्याचे काम ते करत आहेत, असा पलटवार भाजपवर केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो : फडणवीस