मुंबईच्या अटॉप हिलच्या सीजीएस कॉलोनीत सेक्टर 7 मध्ये एका उद्यानाच्या सुशोभीकरणच्या कामासाठी खणलेल्या पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली आहे. यश कुमार चंद्रवंशी( 11) आणि शिवम जैस्वाल अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. कंत्राटदाराने खणलेल्या या खड्ड्यात झालेल्या मुलांच्या मृत्यूसाठी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंत्राटदारावर आरोप करण्यात आले आहे की त्याने उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी मोठा खड्डा खणला होता आणि त्यात पाणी भरलेले होते. त्याने हे काम अर्धवट केले. या उद्यानात मुले खेळण्यासाठी जातात सोमवारी देखील मुले दररोज प्रमाणे खेळायला गेली असता यशकुमार आणि शिवम संध्याकाळी या खड्ड्यात पडले आणि पाणी त्यांच्या नाका तोंडात गेले आणि त्यांचा दुर्देवी अंत झाला. घटनेची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलांचे मृतदेह पाण्यातून काढले आणि रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे मुलांचा अंत झाल्यामुळे कंत्राटदारावर लोक चिडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.