Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक ! वांद्रे-वरळी सी लिंकवर एकाने गाडी थांबवून थेट पाण्यात मारली उडी …

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2023 (20:54 IST)
आज दिवसभरात केवळ मुंबईतूनच थरकाप उडवणार्‍या घटना समोर येत आहेत. जयपूर एक्स्प्रेस दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच आता आत्महत्येची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका ५५ वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी एका कारचालकानो मध्यभागी कार थांबवली आणि पाण्यात उडी घेतली. तटरक्षक दलाच्या मदतीने मुंबई पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने ही शोधमोहीम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून उडी मारलेल्या व्यक्तीच्या शोधात तटरक्षक दलासह इतर पथकंही गुंतली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती कारमधून वांद्रे-वरळी सी लिंक वर जात होती. यानंतर गाडी पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने गाडी थांबवली आणि थेट समुद्रात उडी घेतली.
तटरक्षक दल आणि इतर अधिकाऱ्यांना आत्महत्येच्या प्रयत्नाची माहिती मिळताच त्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या कामात हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे.
 
मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी-लिंकला सुसाईड पॉइंट मानलं जातं. इथून अनेकदा लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने सरकारकडे उत्तर मागितल्यानंतर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवण्यात आली. आज पुन्हा एक घटना समोर आल्याने इथल्या हा मुद्दा वर आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments