Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप

सहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप
, सोमवार, 26 एप्रिल 2021 (15:23 IST)
ठाण्यात वतर्कनगर येथील वेदांत रुग्णालयाकडून ऑक्सिजनचे नियोजन न केल्याने सहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच खासगी रुग्णालयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे ही पाचंगे यांनी सांगितले आहे. 
 
या  रुग्णालयाकडून मृत्यू चे कारण अजून सांगण्यात आले नाही. रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णालय परिसरात आक्रोश सुरू आहे. मृत झालेल्या रूग्णांची अरुण शेलार (५१), करुणा पष्टे (६७), विजय पाटील (५७), दिनेश पणकार (४१) अशी नावे आहेत.
 
ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असताना दुसरीकडे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रशासनाला योग्य ती कारवाई आणि चौकशी करावी. रुग्ण हे अत्यवस्थ (क्रीटकल) होते असे डावखरे याना रुग्णालय यांनी कळवले आहे. रुग्णालय खाली नातेवाईक आणि मनसे भाजप पक्षाचे पदाधिकारी जमले.  रुग्णालय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत दाखल, महाराष्ट्राला ४४ टन ऑक्सिजनचा पुरवठा