Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर गुन्हा दाखल करण्यात येणार

Webdunia
शुक्रवार, 10 जुलै 2020 (17:32 IST)
कोविड-१९चा प्रादुर्भाव होत असल्याने कल्याण-डोंबिवलीत अगोदर कंटेंटमेंट झोन जाहीर केले आहे. तसेच धोका लक्षात घेऊन अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, लोकांना क्वारंटाईन करुनही काही जण घराबाहेर फिरताना दिसत असल्याने कल्याण-डोंबिवली पालिकेने कडक इशारा देताना गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
 
लॉकडाऊन असताना रुग्णांची सख्या कमी होत नसल्याने दोन तारखेपासून दहा दिवसाचा पुन्हा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेकडून ज्यांच्या घरात सुविधा आहेत, अशा रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मात्र काही रुग्ण या सुविधेचा गैरफायदा घेत नजर चुकवून घराबाहेर फिरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असे रुग्ण सोसायटीच्या सदस्यांना न जुमानता बाहेर पडत असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात आता डिजिटल पेमेंट

मुंबईत पाण्याच्या टाकीवरून पडून एका बीएमसी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

‘हनीट्रॅप’मध्ये अडकलेल्या लष्करी अधिकाऱ्याला अटक

5 रुपये खर्चल्यामुळे आईने चिमुकल्याला दिले चटके

काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या हत्या , आरोपीला चकमकीत अटक

पुढील लेख
Show comments