Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांनी यांनी सर्व पालकमंत्र्यांना दिले निर्देश

The Chief Minister
मुंबई , सोमवार, 27 डिसेंबर 2021 (17:55 IST)
राज्यात कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (omicron) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे, नवीन वर्षांच्या जानेवारी (January ) महिन्याच्या मध्यात कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 10 हजार सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहे. तर गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णात 50 टक्के वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पालकमंत्र्यांना लसीकरणासाठी निर्देश दिले आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढेल अशी काळजी घ्यावी. कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. तसंच, टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभा अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घ्यायला ठाकरे सरकार घाबरत आहे का?