Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुंबईत कोरोनाबाधित मृतांची संख्या १९ हजार ७५५ वर पोहोचली

corona
, गुरूवार, 20 एप्रिल 2023 (07:38 IST)
आतापर्यंत मुंबईत कोरोनाबाधित मृतांची संख्या १९ हजार ७५५ वर पोहोचली आहे. तर, राज्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४८९ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने एकीकडे रुग्ण संख्या वाढत असून दुसरीकडे अधूनमधून कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद होत असल्याने शासकीय व पालिका आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे १ हजार १०० नवीन रुग्ण आढळले असून त्यामध्ये, मुंबईतील २३४ रुग्णांचा समावेश आहे.
 
मुंबईसह राज्यात कोरोनाचे (Covid-19) रुग्ण कमी – अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनामुळे बुधवारी मुंबईत २३४ नवीन रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, संपूर्ण राज्यात कोरोनाचे १ हजार १०० रुग्ण आढळले असून दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
राज्यात दिवसभरात १ हजार ११२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ८० लाख ३ हजार ८०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ६ हजार १०२ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत बुधवारी २३४ नवीन रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत मुंबईतील रुग्णांची संख्या ११ लाख ६१ हजार १३६ झाली आहे. तसेच, दिवसभरात ३१९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत ११ लाख ३९ हजार ७९० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या १ हजार ५९२ सक्रिय रुग्ण आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लखनऊचा राजस्थानवर सुपर विजय