Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना रूग्णांची संख्या वाढली, मुंबई महापालिकेकडून मिशन धारावी सुरु

The number of corona patients
, सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (16:17 IST)
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे  मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मिशन धारावी सुरु केले आहे. महापालिकेने दादर, माहीम ,धारावीत पुन्हा एकदा कोरोना विरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. दहा ठिकाणी कोरोना चाचण्यांची शिबीर घेतली जाणार आहेत. 
 
मुंबई महापालिकेकडून शहरामध्ये 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणी सुरू असताना धारावी, दादर, माहीममध्ये विशेष कोरोना चाचणी शिबीर घेण्यात येणार आहेत. मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबीर 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरला ही घेण्यात येणार आहेत.  
 
मुंबई महापालिकेद्वारे माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या दरम्यान नागरिकांची आरोग्य तापसणी, कोरोना चाचण्या सातत्याने केल्या जात आहेत. लोकांच्या संपर्कात येणाऱ्या दुकानदार, फेरीवाले, हॉटेल कर्मचारी, फुल मार्केट व्यापारी यांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत.
 
कोरोनाच्या सर्व समूह तपासण्या, चाचणी शिबीरांचे आयोजन, पालिकेचे दवाखाने येथे टेस्ट घेतल्या जात आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली तर कोविड सेंटर सज्ज आहेत. नागरिकांनी मास्क घालावेत यासाठी प्रबोधन केल जात आहे, मास्क न घालणाऱ्या लोकांवर दंड लावला जात आहे. मंदिर आणि धार्मिक स्थळं खुली झाल्यावर गर्दी होत आहे. त्यामुळे मंदिर आणि धार्मिक स्थळांमधील पुजाऱ्यांच्या ही टेस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या २६ नोव्हेंबरला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम बंद आंदोलन