Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (17:33 IST)
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरिया डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, लेप्टो या पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट गडद होताना दिसत आहे. 
 
दरम्यान, पावसाळी आजारांमुळे आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसला तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 2020 मध्ये वर्षभरात मलेरियाचे 5007 रुग्ण आढळले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे 240 रुग्ण 8 मृत्यू, डेंग्यूचे 129 रुग्ण 3 मृत्यू आणि गॅस्ट्रोचे 2549, ‘एच1एन1’चे 44 रुग्ण आढळले होते.
 
यावर्षी 1 जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत गॅस्ट्रोचे एकूण 2318, लेप्टोचे 96, डेंग्यूचे 77, गॅस्ट्रोचे 1572 तर ‘एच1एन1’चे 28 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाची रुग्णसंख्या तुलनेने दुप्पट होत असते. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही.
 
त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासह इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

एकत्र राहिलो तर सुरक्षित राहू चिमूरमध्ये पंतप्रधान मोदी यांची गर्जना

अफगाणिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली

भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने चेन्नई ग्रँड मास्टर्स विजेतेपद जिंकले

Maruti Dzire Facelift: नवीन वैशिष्ट्यांसह मारुती सुझुकीची सेडान,कीमत जाणून घ्या

भाजप आणि त्यांचे सहकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

पुढील लेख
Show comments