Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

14-year-old girl molested
, शुक्रवार, 16 मे 2025 (11:26 IST)
मुंबईतील दादर परिसरात एका 14वर्षीय मुलीवर उबर चालकाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी चालकाचे नाव श्रेयांश असे आहे, मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने शाळेतून घरी जाण्यासाठी राईड बुक केली होती, परंतु ड्रायव्हरने तिला एका निर्जन भागात नेले आणि तिचा विनयभंग केला. मुंबई पोलिसांनी बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पीडित मुलगी पवईत  राहते. बुधवारी 14 मे रोजी ती प्रभादेवीच्या एका शैक्षणिक संस्थेत गेली होती. घरी येण्यासाठी तिने एका खासगी अप ने टॅक्सी बुक केली. ती टॅक्सीत बसली मात्र वाहन चालकाने गाडी सांगितलेल्या पत्त्यावर न नेता पूर्व द्रुतगती महामार्गावरील एका निर्जन स्थळी नेली आजूबाजूला एकांत पाहून त्याने मुलीशी गैरवर्तन कारण तिचा विनयभंग केला. 
या सर्व घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि कशीबशी घरी पोहोचली. तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितली. तिच्या वडिलांनी वाहन चालकाला शिक्षा मिळवण्यासाठी पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेत ते मुलीसह दादरच्या पोलीस ठाण्यात गेले आणि घडलेला प्रकार सांगितला. 
या प्रकरणी दादर पोलिसांनी उबेर कम्पनीच्या चालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 12 अंतर्गत विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून  त्याला अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वादळाचा इशारा Weather Update