Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Webdunia
शुक्रवार, 16 मे 2025 (11:26 IST)
मुंबईतील दादर परिसरात एका 14वर्षीय मुलीवर उबर चालकाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी चालकाचे नाव श्रेयांश असे आहे, मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने शाळेतून घरी जाण्यासाठी राईड बुक केली होती, परंतु ड्रायव्हरने तिला एका निर्जन भागात नेले आणि तिचा विनयभंग केला. मुंबई पोलिसांनी बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
ALSO READ: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक
पीडित मुलगी पवईत  राहते. बुधवारी 14 मे रोजी ती प्रभादेवीच्या एका शैक्षणिक संस्थेत गेली होती. घरी येण्यासाठी तिने एका खासगी अप ने टॅक्सी बुक केली. ती टॅक्सीत बसली मात्र वाहन चालकाने गाडी सांगितलेल्या पत्त्यावर न नेता पूर्व द्रुतगती महामार्गावरील एका निर्जन स्थळी नेली आजूबाजूला एकांत पाहून त्याने मुलीशी गैरवर्तन कारण तिचा विनयभंग केला. 
ALSO READ: Boycott Turkey मुंबई विमानतळावर तुर्की सेवा बंद होणार! शिवसेनेने गोंधळ घातला, बंद केल्यास काय परिणाम होईल?
या सर्व घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि कशीबशी घरी पोहोचली. तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितली. तिच्या वडिलांनी वाहन चालकाला शिक्षा मिळवण्यासाठी पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेत ते मुलीसह दादरच्या पोलीस ठाण्यात गेले आणि घडलेला प्रकार सांगितला. 
ALSO READ: मुंबईकरांसाठी चांगली बातमी, दहिसर पूर्व ते काशीगाव दरम्यानच्या मुंबई मेट्रो चाचणीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला
या प्रकरणी दादर पोलिसांनी उबेर कम्पनीच्या चालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 12 अंतर्गत विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून  त्याला अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

बुलढाणा : लग्नात तलवार घेऊन नाचले, शिवसेना युबीटी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिष्कारावर संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

ट्रम्प यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments