Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी: उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी: उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
, सोमवार, 11 मे 2020 (22:47 IST)
मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी, अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.
 
फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करुन व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत ठाकरे यांनी म्हटले की आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. 
 
महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केलं आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या संख्या २३ हजार ४०० च्या पुढे