देशात सध्या लसीकरणामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच दिवसाला सहालाख लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर लोकांनाही सहकार्य करण्याची आवश्कता असून मुस्लिमांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यात सध्या तीन दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्राकडे लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
गावागावात न घाबरता लसीकरण झाले पाहिजे. अनेकांमध्ये गैरसमज असून, मुस्लिमांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मुस्लीम धर्मगुरू व राजकीय नेत्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
मुस्लिमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून तो वाढवला पाहिजे. ते चांगला प्रतिसाद देत आहेत. मुस्लिमांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील व तेही लसीकरणाला प्रतिसाद देतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.