Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब, धुके आणि धूळ वातावरणात असल्याने दृश्यमानता कमी झाली

मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब, धुके आणि धूळ वातावरणात असल्याने दृश्यमानता कमी झाली
, सोमवार, 24 जानेवारी 2022 (09:52 IST)
मुंबईतील हवा आज सगळ्यात खराब असल्याचं समोर आलं असून येथे Air Quality Index 267 वर गेल्याची नोंद झाली आहे. मालाड येथील 'Air Quality Coordinates' 436 म्हणजेच 'Acute pollution' या श्रेणीत होता.
 
भांडुप येथे 336, माझगाव येथे 372, वरळी येथे 319, वांद्रे कुर्ला संकुल येथे 307, चेंबूर 347, अंधेरी 340 असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला असून या ठिकाणांवरील हवा अतिवाईट श्रेणीत आहे. तर कुलाबा अथे हवा गुणवत्ता निर्देशांक 221 म्हणजेच वाईट श्रेणीत आहे.
 
मुंबई समुद्र किनाऱ्यावर धोक्याची चादर पाहायला मिळत आहे. येथे वातावरणात दृश्यमानता कमी असल्याने कमी दिसत आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणावर धुके आणि धूळ वातावरणात असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे तसेच आकाशात धुरकट दिसून येते.
 
सेंटर फॉर साइंस एंड एनवायरनमेंट द्वारे क्षेत्रीय वायु प्रदूषणाच्या पातळीवर एका विश्लेषणद्वारे निष्कर्ष काढण्यात आले आहे की समुद्रच्या जवळीकने राजधानी मुंबईत वाढत्या वायु प्रदूषण थांवण्यात मदत केलेली नाही.
 
या विश्लेषणात 1 जानेवारी 2019 ते 9 जानेवारी 2022 च्या काळासाठी PM2.5 एकाग्रतेत वार्षिक आणि मोसमी रुझान आकलन होते. या दरम्यान मुंबईत खराब दिवसांची संख्या दुप्पट झाली आहे जेव्हाकि चांगल्या दिवसांत 20 टक्क्यांची कमी आली आहे.
 
सीएसई विश्लेषण संकेत देत आहे की मुंबईत खराब वायु गुणवत्ता असलेल्या दिवसांची संख्या वाढत आहे. शहरात पूर्व मध्य मुंबईत कुर्ला येथे केवळ 55 टक्के डेटा होता तर उत्तरी मुंबईत मलाड येथे 68 टक्के होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत पावसामुळे थंडी वाढली, हवामान खात्याचा अंदाज- तापमानात घट होऊ शकते