suvichar

आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, अंतरंगही भगवेच : उध्दव ठाकरे

Webdunia
शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:40 IST)
मी डरणारा नाही तर म  लढणारा आहे हे लक्षात असू देत. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण मला खोटे पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न झाला. 2014 मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचे अंतरंग भगवेच आहे असे उद्धव यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी टीका झाली. मात्र मला आज भाजपला विचाराचे आहे की तुमचे काय काय उघड झाले? युती तर तुम्ही 2014 लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावे ठेवत आहात का? असे उद्धव यांनी म्हटले आहे.
 
मुंबईत शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. 
 
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या अकरा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सगळ्यांना यांच्यावरुन उद्धव यांनी अभिवादन केले. सत्काराला उत्तर देताना मुख्यमत्र्यांनी भाजपवर सडकून टीका केली आणि काँग्रेसराष्ट्रवादी यांच्याबरोबर आघाडी करणामागचे कारण स्पष्ट केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आज हक्काने माझ्या शिवसैनिकांचा
पहिला सत्कार स्वीकारला. या सत्कार सोहळच्यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर होणार कारवाई! रेल्वेने आपली कठोरता वाढवली

पुढील लेख
Show comments