Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विचित्र घटना, बेपत्ता पत्नीचा शोध घेतला असता दुसरेच सत्य आले समोर

Webdunia
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (08:26 IST)
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये विचित्र घटना घडली आहे. बेपत्ता झालेल्या पत्नीचा शोध घेत पती शेवटी मित्राच्या रुमवर पोहोचला. रुमवर पोहोचलेल्या आतमध्ये पत्नीसह मित्राचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
 
एका फ्लॅटमध्ये एक पुरूष व एका स्त्रिचा मृतदेह आढळून आला होता. दोघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. जयंती शाह असं मृत महिलेच नाव आहे. जयंती शाह घरातून बेपत्ता होत्या. त्यांचे पती अजित यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. रुममध्ये आढळलेला दुसरा मृतदेह संदीप सक्सेना यांचा होता. सक्सेना अजित यांचे मित्र होते.
 
या घटनेमध्ये संदीप यांनी स्टोन ग्राईंडरच्या मदतीने स्वतःचा गळा चिरलेला होता. संदीपने आधी जयंती यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचं प्राथमिक अंदाजावरून पोलिसांनी सांगितलं. सक्सेना व अजित अंबरनाथमधील एका कंपनीत काम करायचे. सक्सेना नियमितपणे अजितच्या घरी येत जात असे. त्यामुळे अजित यांच्या पत्नी जयंती यांचे सक्सेना यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध होते,” अशी पोलिसांनी सांगितलं. तर सक्सेना आणि आपली पत्नी जयंतीमध्ये शारीरिक संबध होते व आपण त्याला विरोध केला होता, अशी माहिती अजित यांनी पोलिसांना दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू आयपीएल २०२७ मध्ये सहभागी होणार नाहीत, प्रशिक्षकांनी दिले संकेत

सुप्रिया सुळे यांनी एफसीआरए विधेयकाला त्याच्या सध्याच्या स्वरूपात विरोध केला

लिओनेल मेस्सीच्या वडिलांचे, दीर्घ आजारानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

LIVE: नाशिकमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के, अनेक घरांना तडे गेले

Jagtik adivasi Day 2026: जागतिक आदिवासी दिन का साजरा करतात

पुढील लेख
Show comments