Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिसांच्या प्रयत्नाने व्यावसायिकाला सोन्याने भरलेली बॅग परत मिळाली

gold
, शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (13:06 IST)
मुंबईच्या जोगेश्वरी येथे एका व्यावसायिकाची कॅब मध्ये सोन्याने भरलेली बॅग मुंबई पोलिसांच्या प्रयत्नामुळे परत मिळाली.या साठी त्याने पोलीस विभागाचे आभार मानले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यावसायिकाने आपल्या कुटुंबियांसह 9 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यातील वसई वरून जोगेश्वरीच्या जाण्यासाठी एक कॅब घेतली आणि उतरल्यावर त्यांना लक्षात आले की सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग कॅब मध्येच राहिली.कॅब चालक निघून गेला होता.नंतर त्यांनी कॅब चालकाला फोन केल्यावर त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याने फोन उचलला नाही. 

व्यावसायिकाने या बॅग गहाण झाल्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी कॅब चालकाला फोन करून देखील त्याने फोन घेतला नाही. या वर पोलिसांना कॅब चालकावर संशय आला आणि त्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कॅब चालकाच्या पत्नीचा फोन नंबर शोधून काढला आणि बॅग बद्दल विचारणा केली असता तिने घरीच बॅग असल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी कॅब चालकाच्या घरी वसईला जाऊन बॅग ताब्यात घेतली. या बागेत 350 ग्राम सोन्याचे दागिने असून त्यांची किंमत सुमारे 25 लाख होती. व्यावसायिकाने बॅग परत  मिळाल्यामुळे सुटकेचा श्वास घेतला. त्याने पोलिसांचे कौतुक केले आणि आभार मानले.  .
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणूक आयोग आज करणार विधानसभा निवडणुकांची घोषणा, तारखांकडे महाराष्ट्राचेही लक्ष