Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाणे शहरात नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, नाशिकमधून आरोपीला अटक

arrest
, शनिवार, 5 एप्रिल 2025 (15:39 IST)
ठाणे शहरात नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करून धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा आरोपी दोन आरोपांमध्ये वॉन्टेड असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
ठाणे शहरातील एका महिलेला नौकरीच्या आमिष दाखवत  आरोपीने 16 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान डोंबिवलीतील दावडी परिसरात तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. पीडितेने सांगितल्यानुसार, आरोपीने तिला सोशल मीडियाच्या माध्यमाने मुंबई विमानतळावर नौकरी लावून देण्याचे सांगितले. तिला त्याच्या ऑफिस मध्ये येण्यास सांगितले नंतर तिला बंदुकीचा धाक दाखवून तिच्या कुटुंबियांना इजा पोहोचवण्याची धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.  
मानपाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 64, 74, 115(2) आणि भारतीय दंड संहिता (बीएनएस) च्या इतर संबंधित कलमांखाली तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवला आणि त्याच्याविरुद्ध टिळक नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला,गुप्तचर माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या आरोपीला नाशिकमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंबरनाथ : गेम खेळण्यापासून रोखण्यासाठी पालकांनी मोबाईल घेतला, मुलाने केली आत्महत्या