Dharma Sangrah
✕

मुंबई लोकलमध्ये फॅशन डिझायनरचा विनयभंग, १२ दिवसानंतर आरोपीला अटक

Webdunia
गुरूवार, 6 मार्च 2025 (08:49 IST)
Mumbai News: मुंबईतील कुर्ला ते सायन दरम्यान लोकल ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या २३ वर्षीय आरोपीला दादर रेल्वे पोलिसांनी १२ दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ALSO READ: आता धारावी प्रकल्पात राहुल गांधींचा प्रवेश, आज मुंबईत व्यावसायिकांशी संवाद साधणार
मिळालेल्या माहितीनुसार कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकांदरम्यान चालत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीसमोर अश्लील कृत्य करून फरार झालेल्या आरोपीला दादर रेल्वे पोलिसांनी घटनेच्या १२ दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव राहुल किसन जगधने आहे, त्याने पोलिस चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे.
ALSO READ: महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये आज तापमान वाढणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० फेब्रुवारी रोजी रात्री १०:१५ च्या सुमारास घडली, जेव्हा पीडित महिला कुर्लाहून सायनला जाणाऱ्या लोकल ट्रेनने प्रवास करत होती. त्याच वेळी, महिलांच्या डब्याजवळ असलेल्या अपंगांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या आरोपीने तिला पाहिले आणि अश्लील हावभाव केले आणि लज्जास्पद कृत्य केले. मुलीने विरोध करण्यापूर्वीच आरोपीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि पळून गेला. या घटनेने घाबरलेल्या पीडितेने दादर रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. व आरोपीला बेड्या ठोकल्या. 
ALSO READ: उद्धव यांनी केली मागणी, अबू आझमी यांना तुरुंगात पाठवले जाईल-मुख्यमंत्री
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

अंडर-१९ आशिया चषकावर भारताची मोहोर; अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

रुपाली चाकणकर यांचे नाव आणि फोटोचे 'ट्रेडमार्क' रजिस्ट्रेशन; विनापरवाना वापरावर कारवाईचा इशारा

राज्यात थंडीचा कडाका वाढला; धुळ्यात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Birsa Munda Jayanti 2026 Wishes in Marathi बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

पुढील लेख