Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
, रविवार, 28 जुलै 2024 (13:28 IST)
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी शिरून पाण्यात अडकून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी तापसांनंतर कोचिंग सेंटरचे मालक आणि कॉर्डिनेटरला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरु केला आहे 
 
दिल्लीत सध्या पावसाचा जोर आहे पावसाळ्यानंतर दिल्लीतील जुने राजेंद्रनगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचे पाणी साचले या पाण्यात अडकून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. मयत  झालेल्या तिनी विद्यार्थ्यांची ओळख पातळी असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम 105, 106 (1), 152, 290 आणि 35 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग सेंटरमध्ये लावलेल्या लोखंडी गेटमुळे हा अपघात झाला. रस्त्यावर वाहून जाणारे पाणी थांबवण्यासाठी हे गेट बसवण्यात आले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एका ट्रकच्या दाबामुळे हे गेट तुटले आणि रस्त्यावरून वाहणारे सर्व पाणी तळघरात साचले. 
 
प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने सांगितले की,अपघात झाला तेव्हा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये 30 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. त्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात एक लायब्ररी होती. काही वेळातच तळघरातील पाण्याची पातळी डोक्याच्या वर गेली. यानंतर बचावकार्य सुरू झाले आणि दोरी फेकून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.घाण पाण्यामुळे विद्यार्थी अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी दोरखंड टाकण्यात आली असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेसाठी त्यांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. एका आंदोलक विद्यार्थ्याने एमसीडीवर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाला, “येथील 80 टक्के लायब्ररी तळघरात आहेत. थोड्याशा पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.येथील स्वच्छता व्यवस्थेची जबाबदारी एमसीडीची आहे.लायब्ररीतून बाहेर काढण्यासाठी 12 ते 15 तास लागले.
Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी