Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कासगंज जिल्ह्यात मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी महिला कोतवाली सदर परिसरातील मोहनपुरा गावात माती गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी एक मातीचा ढिगारा घसरला आणि त्याखाली अनेक महिला गाडल्या गेल्या. यामध्ये एका लहान मुलीसह चार महिलांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कासगंजजवळ राष्ट्रीय महामार्ग 530 बनवला जात आहे. येथील उत्खननादरम्यान पिवळी माती काढली जात आहे. ही माती गोळा करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील महिला मंगळवारी सकाळी मोहनपुरा येथील महामार्गावर पोहोचल्या होत्या. माती खोदून काढत असताना मातीचा ढिगारा घसरला. त्यात एका लहान मुलीसह 9 हून अधिक महिला दाबल्या गेल्या. तात्काळ पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या महिलांना बाहेर काढण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.पण यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पाच महिला गंभीर जखमी असून, त्यापैकी दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. जखमींना रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकारींनी दिले आहे.
Edited By- Dhanashri Naik