Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान

5 Pakistan Soldiers Killed
नियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाकच्या पाच सैनिकांना कंठस्नान घातले असून तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तसेच गोळीबारामध्ये पाकिस्तानचे 20 जवान ठार झाल्याचेही वृत्त आहे. 
 
सोमवारी पाक सैनिकांनी पुंछ जिल्ह्यात एलओसीजवळ वस्ती आणि अग्रिम चेक पॉइंट्सवर गोळीबार करत संघर्ष विरामाचे उल्लंघन केले होते.
 
याआधी जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्या कारवाईत पाकिस्तानचे किमान 8 ते दहा रेंजर्सही ठार झाले होते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार