मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला असून हा अपघात ओडिशामधील जाजपूर येथे झाला आहे. जाजपूर येथील उड्डाणपुलावरून एक बस जात होती. ही बस प्रवाशांनी भरलेली होती, तसेच ही बस उड्डाणपुलावरून खाली पडली असून त्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून पाच जण मृत्यूमुखी पडले आहे. ही बस सर्व प्रवाशांना पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया येथे घेऊन चालली होती. एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू या अपघातामध्ये झालं आहे. तसे चाळीस पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर अली आहे. या अपघाताची माहिती पोलीस घटनास्थळी पोहचले व जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात रात्री राष्ट्रीय महामार्ग 16 वर असलेल्या पुलावर घडला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या लोकांवर कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहे. या अपघातामुळे परिसरात गोंधळ उडाला. अचानक घडलेला हा अपघात खूप भयंकर होता. बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली व यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाला तीन लाख रुपयांची मदत केली जाणार आहे अशी घोषणा केली गेली आहे.