Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कर्नाटकात 65. 59 टक्के मतदान; 2615 उमेदवारांचे राजकिय भविष्य मतपेटीत बंद

karnatak election 2023
, गुरूवार, 11 मे 2023 (08:06 IST)
कर्नाटकातील 224 विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान संपन्न झाले. 224 विधानसभा जागांसाठी सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65. 59 टक्के झाले असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. यापुर्वी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 72. 36 टक्के विक्रमी मतदान झाले होते.
 
एकूण 224 जागासाठी झालेल्या या मतदानानंतर सरकार स्थापन्यासाठी बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता असणार आहे. यासाठी राज्यभरातील 2615 उमेदवारांचे राजकिय भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदानासाठी एकूण 42, 48,028 नवीन मतदारांची नोंदणी झाली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये प्रचारसभेत मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मतदारांना ‘शहाणपणाने मतदान’ करण्याचे आवाहन केले आहे.
 
दरम्यान, बल्लारी येथील मतदान केंद्रावर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त असून त्यात अनेकजण जखमी झाले आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान दोन मतदारांचा मृत्यू झाला असून बेळगाव जिल्ह्यातील एका बूथवर मतदानासाठी रांगेत उभ्या असताना एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर बेलूर येथील चिक्कोले येथे मतदानावेळी जयन्ना (४९) यांचा मृत्यू झाला. विजयपुरा येथील एका घटनेत, मसाबिनालाच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम वाहून नेणारे वाहन थांबवून एका अधिकाऱ्याला मारहाण केली. तसेच नियंत्रण आणि बॅलेट युनिट्सचे नुकसान केल्याने 23 लोकांना अटक करण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी !