आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यात काही उग्रवाद्यांनी गुरुवारी रात्री सात ट्रकांमध्ये आग लावली ज्यामुळे पाच ट्रक चालकांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दिमा हसाओ जिल्ह्यातील उमरंगसो लंका रोडवरील दिसमाओ गावाजवळून सात ट्रक चालले होते. या दरम्यान उग्रवाद्यांनी ट्रकच्या दिशेने गोळीबार केला आणि यानंतर ट्रकला आगीच्या हवाले केले.
अहवालानुसार, आसाम पोलिसांना संशय आहे की या घटनेमागे दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मीचे (डीएनएलए) सदस्यांचा हात आहे. पोलिसांनी सांगितले की घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि पाच जळालेले मृतदेह बाहेर काढले.
पोलिसांनी सांगितले की, दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मीच्या संशयित बदमाशांच्या गटाने गुरुवारी रात्री दीनमुख पोलीस स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर रेंजरबील भागात ट्रकवर गोळीबार केला. पोलिसांनी सांगितले की, दोन ट्रकचालकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर इतर तिघांचा दहशतवाद्यांनी ट्रक पेटवून दिल्यानंतर मृत्यू झाला.
ते म्हणाले की, ही घटना घडली तेव्हा ट्रक दिमा हसाओ मधील उमरांग्शु येथून होजाई जिल्ह्यातील लंकेकडे जात होते. पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. एका वरिष्ठ जिल्हा पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी, ट्रक मालकांनी दावा केला आहे की अतिरेक्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहनही केले आहे.