Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नूडल्स फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाल्याने पाच ठार, 10 हून अधिक कामगार जखमी

A boiler explosion at a noodles factory killed five and injured more than 10 workers नूडल्स फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाल्याने पाच ठार
, रविवार, 26 डिसेंबर 2021 (13:11 IST)
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये रविवारी सकाळी नूडल्स कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट होऊन मोठा स्फोट झाला. या अपघातात कारखान्यात काम करणाऱ्या चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा मजूर जखमी झाले आहेत. नूडल्स कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे शेजारील बांगड्या आणि गव्हाच्या पिठाच्या कारखान्याचेही नुकसान झाले आहे. त्यात आत काम करणारे दोघेही जखमी झाले. एसएसपी जयंतकांत घटनास्थळी पोहोचले आहेत.  हा अपघात शहरातील बेला फेज-2 येथील बेला पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथील नूडल्स कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज 5 किमी दूरपर्यंत ऐकू आला. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. सध्या पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SA: पहिल्या कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते, या खेळाडूला संधी मिळू शकते