Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमासाठी जोडप्याचे टोकाचे पाऊल

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2023 (15:55 IST)
प्रेम कधी आणि कोणाशीही होऊ शकत. प्रेमाखातर लोक जीव देऊ पण शकतात आणि घेऊ पण शकतात.असेच एका प्रेमी जोडप्याने प्रेमासाठी आत्महत्या करण्याचे ठरविले आणि त्याला प्रमाणे हाताची नस देखील कापली पण रक्ताला पाहून ते दोघे घाबरले आणि आपल्या मित्राला फोन केला मित्राने तातडीनं येऊन दोघांना रुग्णालयात नेले.हे सर्व प्रकार घडला आहे उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद येथे. इंजिनियर असलेला मुलगा बंगळूर मध्ये काम करणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला. कोरोनाच्या काळात त्यांची ओळख झाली आणि नंतर प्रेम झाले. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला .मात्र त्यांच्या कुटुंबियांना ह्यांचे लग्न मान्य न्हवते. मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरविले गेले. नंतर दोघांनी जीव देण्याचा विचार केला आणि शिकोहाबाद येथे एका हॉटेल मध्ये एक खोली घेतली आणि आत्महत्या करण्यासाठी त्याणी पेपर कपणाऱ्या चाकूने स्वतःच्या हाताची नस कापली. रक्त आलेलं बघून ते दोघे घाबरले आणि त्यांनी आपल्या मित्राला फोन केला. की आम्ही आपल्या हाताची नस आणि गळा चिरला आहे आम्हाला जगायचं आहे. आम्हाला वाचावं. मित्राने तातडीनं हॉटेल गाठलं आणि मॅनेजरच्या मदतीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक सांगितली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पेपर कटिंग चाकू जप्त केले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments