Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

डॉक्टरची मैत्रिणीसह तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

suicide
, सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (14:36 IST)
झारखंडमधील एका मोठ्या रुग्णालयामध्ये एका डॉक्टरने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर आपल्या मैत्रिणीसोबत हॉस्टेलच्या टेरेसवर बसले होते, असे सांगितले जात आहे. त्यानंतर काही गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर डॉक्टरने आणि त्याच्या मैत्रिणीने छतावरून उडी मारली, त्यामुळे डॉक्टरचा मृत्यू झाला आणि तरुणी गंभीररीत्या जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मृत डॉक्टर हा एमबीबीएसचे शिक्षण घेऊन ऑर्थोपेडिक विभागात पीजी द्वितीय वर्षात शिकत होता. ड्युटी संपवून तो मैत्रिणीसोबत हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. रात्री काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर दोघांनीही छतावरून उडी मारली. दोघांनाही जखमी अवस्थेत रिम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात असून उपचारादरम्यान डॉक्टर मृत्यू झाला असून तरुणीवर उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 
 
रात्री उशिरा बरियातू पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे सांगितले, पण दोघांनी छतावरून उडी का मारली याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hockey: जर्मनीविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी वरुण कुमारचे भारतीय संघात पुनरागमन