बांग्लादेशच्या किनाऱ्यावरील परिसरात तांडव केल्यानंतर हे वादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेने पोहचले आहे. या हे वादळ 135 प्रति जलद गतीने वाहणारे वारे हे त्यांचे रौद्र रूप दाखवत आहे. तसेच हे चाकरी वादळ रेमलला धडकल्यानंतर आता कोलकत्ता मध्ये आले असून जलद गतीने हवा वाहत असून भयंकर असा पाऊस कोसळत आहे. या वादळामध्ये खांब, झाडे आणि घरांवरील छत गेले उडून गेली आहे. म्हणून कोलकत्ता महानगरपालिका टीम आणि कोलकत्ता पोलीस आपदा प्रबंधन टीम शहरातील अलीपूर क्षेत्रात मुळासकट निघून कोसळलेली झाडे दूर करण्यासाठी कार्य करीत आहे. तसेच महानगरपालिकाचे कर्मचारी रस्ते स्वच्छ करीत आहे. तसेच पाऊस कोसळत आहे.
तसेच रात्रभरापासून पोलीस आणि अन्य संबंधित विभाग अधिकारी अलर्ट मोडवर आहे. तसेच महानगरपालिकाचे कंट्रोल रूम कार्यरत आहे जिथे जर कुठे झाड कोसळले तर त्याची सूचना लागलीच मिळेल. तसेच सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे कोलकत्ता एयर पोर्ट बंद करण्यात आहे आहे.
कोलकत्तामध्ये 110 ते 120 प्रति तास जलद गतीने वारे वाहत आहे. तर याची गती 135 किमी प्रति तास पर्यंत पोहचू शकते. आईएमडी कोलकत्ताचे पूर्वी क्षेत्रचे प्रमुख सोमनाथ दत्ता म्हणाले की, बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर रविवार रात्री 8:30 वाजता लॅण्डफॉल झाले आणि हे 12:30 वाजे पर्यंत चालले.
तसेच सर्व मच्छीमारांना दक्षिण बंगालची खाडी आणि अंदमान समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालमधील संवेदनशील क्षेत्रातून एक लाखापेक्षा जास्त लोकांना काढण्यात आले आहे. दिघा मध्ये लाटा या समुद्र भिंतीवर धडकतांना दिसत आहे.
तसेच कोलकत्तामध्ये होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे अनेक घरांचे छत उडून गेले आहे. तसेच विजेचे खांब देखील कोसळले आहे. तर आहि ठिकाणी मोठे मोठे झाडे देखील मुळासकट उमळून पडली आहे. कोलकात्तामधील रस्ते जलमय झाले आहे.
Edited By- Dhanashri Naik