Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून महिलेच्या चेहऱ्यावर पेट्रोलने भरलेला फुगा फेकत पेटवले

Madhya Pradesh
, बुधवार, 31 जुलै 2024 (13:18 IST)
मध्य प्रदेशमधील जबलपुरमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एक व्यक्तीने एका महिलेवर पेट्रोल ने भरलेला फुगा फेकून आग लावली. यानंतर आरोपीने स्वतःवर पेट्रोल टाकत आग स्वतःला आग लावली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी ही आग विझवून दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महिला माने गावातील रहिवासी आहे. तसेच ती फुलहारांचे दुकान चालवते. त्याच वेळी हा व्यक्ती महिलेशी लग्न कारण्याबद्दल वाद घालू लागला. महिलेने नकार दिला.यामुळे रागात असलेल्या व्यक्तीने तिच्यावर पेट्रोलने भरलेला फुगा फेकला व आग लावून दिली. यानंतर, या व्यक्तीने उरलेले पेट्रोल स्वतःवर टाकले व स्वतःला आग लावून घेतली. उपस्थित नागरिकांनी परिस्थीचे गांभीर्य पाहता पटकन आग विझवत दोघांना रुग्णालयात दाखल केले. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पहिल्यापासून विवाहित आहे.व अनेक वेळेस हा व्यक्ती तिला लग्नासाठी दबाव टाकतो म्हणून तिने या आधीदेखील तक्रार केली होती. पोलिसांनी या आरोपी विरुद्ध केस नोंदवून घेत चौकशी सुरु केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वायनाड दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 150 हून अधिक, अद्याप 90 लोकांचा शोध सुरू