आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सोबत लिंक केलं जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. हे कधीपर्यंत केलं जाणार आहे हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डमुळे गोपनीयतेचे उल्लंघन होते की नाही यावर निर्णय दिलेला नाही. त्याआधी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
'आम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत लिंक करण्याचं प्लानिंग करत आहोत. यासंबंधी मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे', अशी माहिती मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. डिजिटल हरियाणा समिट 2017 मध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.