Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उंच भरारी घेणारी शांत स्वभावाची अवनी

उंच भरारी घेणारी शांत स्वभावाची अवनी
कधी काळी ज्या देशात स्त्रिया फक्त घर गृहस्थी चालवण्यासाठी असतात असे विचार होते त्याच देशात आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. स्त्रिया खरंच पुरुषांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमतर नाही हे सिद्ध केले आहे एक आणखी स्त्री शक्ती, देशाच्या लाडक्या मुलीने जिचे नाव आहे अवनी चतुर्वेदी. चेस टेबल टेनिस खेळणे किंवा स्केचिंग आणि पेंटिंग असे तिचे छंद असले तरी तिने इतिहास आपले नाव नोंदवले ते पहिली महिला फायटर पायलट म्हणून.
 
भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा कीर्तिमान स्थापित केला. गुजरातच्या जामनगर एअरबेसने उड्डाण भरून तिने पहिल्या फेरीत हे पूर्ण केले. अवनी फायटर एअरक्राफ्ट उडवणारी प्रथम भारतीय महिला पायलट बनली आणि इतिहासच रचला. 
 
2016 मध्ये अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना या तीन स्त्रियांना प्रथमच वायुसेनेत फायटर पायलट बनण्यासाठी प्रवेश देण्यात आला होता. तत्पूर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये सरकारने स्त्रियांना फायटर पायलट बनण्यासाठीचा मार्ग मोकळा करून दिला होता. ब्रिटन, अमेरिका, इस्रायल आणि पाकिस्तान यासारख्या जगातील निवडक देशांमध्येच स्त्रिया फायटर पायलट बनू शकतात.
 
27 ऑक्टोबर 1993 मध्ये जन्मलेल्या अवनीचे लहानपण मध्यप्रदेश राज्यातील रीवाच्या जवळ एक लहानश्या वस्ती व्यतीत झाले. सुरुवातीला हिंदी मीडियम मध्ये शिकणार्‍या अवनीच्या वडिलांनी सांगितले की ती फारच शांत स्वभावाची आणि अनुशासन प्रिय होती. तिला पायलट व्हायचं कधी असे वाटलेच नव्हते. अवनीने दहावी आणि बारावी वर्गात आपल्या शाळेत टॉप केले होते.
 
अवनीचे वडील इंजिनियर आहे आणि आई हाउस वाइफ. तिचा मोठा भाऊ भारतीय सेनेत आहे. दिनकर चतुर्वेदी यांनी सांगितले की ग्रॅज्युएट होयपर्यंत तिला पायलट व्हायचे हे आम्हाला माहीतच नव्हतं. 2003 मध्ये कल्पना चावला यांच्या मृत्यूनंतर अवनीने त्यांच्याबद्दल वाचले तेव्हा 'मला अंतरीक्षात उड्डाण भरायची आहे' अशी इच्छा दर्शवली. भाऊ सेनेत असल्यामुळे तिने सैन्य जीवन खूप जवळून बघितले होते. देशसेवा ही भावना तेथूनच जन्मली होती. 2014 मध्ये राजस्थानच्या वनस्थळी युनिव्हर्सिटीतून तिने टेक्नॉलॉजीत ग्रॅज्युएशन केले. नंतर अवनीने एअरफोर्सच्या टेक्निल सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी परीक्षा दिली आणि त्यात उर्त्तीण होऊन फायटर पायलट बनली. हैदराबाद एअर फोर्स अॅकेडमीत तिने प्रशिक्षण पूर्ण केले.
 
एखादे लढाऊ विमान एकट्याने उडविणे हे पूर्णतः: एक फायटर पायलट बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल असते. अवनीने यशस्वीरीत्या हे पहिले पाऊल उचलले असून या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या तिच्यासारख्याच महत्त्वाकांक्षी महिलांसाठी एक नवे अवकाशच निर्माण करून दिले आहे. अवनीचे हे यश भारतीय वायुसेनेसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मत एअर कमोडोर प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू आदळून गेला षटकार