Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर 2 जखमी

Accident in Maihar while going from Indore to Mahakumbha
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (18:11 IST)
Madhya Pradesh News: महाकुंभ-२०२५ अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. महाकुंभाच्या शेवटच्या दिवसांत संगमात स्नान करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. महामार्गावरील वाहनांच्या संख्येसोबतच वेगही झपाट्याने वाढत आहे. लोकांना लवकरात लवकर प्रयागराजला पोहोचायचे आहे, त्यामुळे अपघात होत आहे.  वाहन अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. असाच एक भीषण अपघात मैहरमध्ये इंदूरहून प्रयागराजला जाणाऱ्या कारला झाला. या अपघातात कारमधील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातामागील कारण चालकाला झोप लागली असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंदूरहून कारने प्रवास करणारे भाविक महाकुंभासाठी प्रयागराजला जात असताना मैहरमध्ये अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघे एकाच कुटुंबातील आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, इंदूरमधील इंद्रजित नगर येथील कचलानी कुटुंब कारने महाकुंभाला जात होते. रविवारी सकाळी मैहरजवळ त्यांची गाडी दुभाजकाला धडकली. या अपघातात गीता कचलानी आणि चालक प्रसाद धरणगावकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ईश्वर कचलानी आणि त्यांची मुलगी विनीता गंभीर जखमी झाले. नंतर, विनीता कचलानी यांचा देखील मृत्यू झाला. तसेच दोन्ही जखमींना गंभीर स्थितीत कटनी येथे रेफर करण्यात आले.  
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात ४० वर्षीय गीता कचलानी, १९ वर्षीय विनीता कचलानी आणि चालक  ४५ वर्षीय चालक प्रसाद धरणगावकर यांचा मृत्यू झाला आहे.   
ALSO READ: मुंबईतील प्राध्यापकावर विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, सहाय्यक प्राध्यापकांचा राजीनामा
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भरधाव जीप आणि बसची धडक, ६ जणांचा मृत्यू, २ जखमी