Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Accident: अंबाला येथे भीषण अपघातात सात ठार; 20 जखमी

Webdunia
शुक्रवार, 24 मे 2024 (09:46 IST)
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या एका कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलर ट्रॉलीची धडक झाली. अंबाला-दिल्ली महामार्गावरील मोहराजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रॅव्हलरमध्ये एकूण 26 जण होते. यामध्ये सहा महिन्यांच्या मुलीसह सात जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. 
 
हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हलरचा एक भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि जखमी इकडे तिकडे महामार्गावर पडले. तर काही जखमी ट्रॅव्हलरमध्येच अडकले होते. आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमींना बाहेर काढले आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेतून कॅन्टोन्मेंट सिव्हिल हॉस्पिटल आणि आदेश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 
 
मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आले. याप्रकरणी मोहरा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी माहिती देताना एका प्रवाश्याने सांगितले की, ते 23 मे रोजी सायंकाळी वैष्णोदेवीकडे निघाले असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मोहडा येथे येताच अचानक ट्रॉलीसमोर एक वाहन आले. ट्रॉलीने ब्रेक लावताच त्यांचे ट्रॅव्हल्सचे नियंत्रण सुटले आणि ट्रॉलीला धडकली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला.20 जण जखमी झाले असून सध्या काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments